जलयुक्त शिवारची सुडबुद्धीने चौकशी नाही – अजित पवार

Ajit Pawar

मुंबई : फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar Scheme) योजनेची चौकशी सूडबुद्दीने किंवा मुद्दाम लावण्यात आलेली नाही. कॅगच्या अहवालावरून या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येत आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात कॅगचा अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालात जलयुक्त शिवार योजनेबाबत नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

ते म्हणाले, जलयुक्त शिवार योजने संदर्भातील कॅगचा अहवाल कुणाच्या काळात आला, कारण नसताना या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण खाते ज्यांच्याकडे होते त्यांनीच विधान परिषदेत या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले होते. तसे सूतोवाच त्यांनी केले होते असेही पवार यांनी सांगितले.

राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यानंतर भाजपचे (BJP) नेते आक्रमक झाले आहेत. हा निर्णय चुकीचा असून सहभाग घेणाऱ्या जनतेचीही चौकशी करणार का ? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारला केला आहे.

तसेच, ‘जलयुक्त शिवार योजनेच्या एसआयटी चौकशीमधून काहीही निष्पन्न होणार नाही,’ असा दावा माजी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER