अजित पवारांचा हटके अंदाज ; पुन्हा पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोची केली पाहणी

ajit-pawar-Inspection of Pune Metro.jpg

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पुन्हा एकदा हटके अंदाज पाहायला मिळाला.अजित पवारांनी आज पुन्हा (25 सप्टेंबर) पहाटे सहा वाजता पुणे स्टेशन (Pune station) येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोचं (Pune Metro) काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अजित पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करुन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरु असलेल्या कामाबाबत सविस्तर माहीती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेनने प्रवास केला. शिवाजीनगर येथे बोगदा काम, व्हील पार्क येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. येथील कामाचीही उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान याअगोदरही 18 सप्टेंबरला अजित पवारांनी पहाटे-पहाटे पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी मेट्रोने संत तुकाराम नगर ते एचए कंपनीपर्यंत प्रवासही केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER