अजित पवार इंदापूर दौऱ्यावर ; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून जोरदार स्वागताची तयारी

Ajit Pawar

इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) इंदापूर दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तब्बल १०१ किलो वजनाचा तिरंगा हार त्यांना परिधान केला जाणार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अनिकेत वाघ यांनी हा विराट तिरंगा हार तयार करून घेतला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार प्रथमच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.

उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्या इंदापूर दौऱ्यात अजित पवार नेमके काय बोलतात याकडे तालुक्यासह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूर दौऱ्यात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत अजितदादांसाठी १०१ किलो वजनाचा तिरंगा हार तयार करण्यात आला आहे. इंदापूरचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अनिकेत वाघ यांनी पंढरीतील फूल व्यापाऱ्यांकडून हा हार मागवला आहे. या हाराचे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या प्रसिद्ध फूल व्यापार्‍यांकडून हा हार तयार केलेला आहे. या हारात तुळशीचीही पाने आहेत. आमचा विठूराया आमच्या भेटीला येत असल्याने विठूरायाला ज्या पद्धतीने तुळशीचा हार घातला जातो, त्याच पद्धतीने अजितदादांचा यावेळी सत्कार आम्ही करत असल्याच्या भावना नगरसेवक अनिकेत वाघ यांनी व्यक्त केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER