‘प्रीवेडिंग’वाल्यांना अडवू नका; ते हनिमूनालाही इथेच आले पाहिजेत! अजित पवारांनी दिली प्रेमळ समज

Ajit Pawar inaugurated the Shrivardhan Beach Project

रायगड : श्रीवर्धनच्या (Shrivardhan Beach) समुद्रकिनाऱ्यावर ‘प्रीवेडिंग फोटो / शुटिंग’ला (pre-wedding photo / shooting) स्थानिक लोक विरोध करतात. त्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) गावकऱ्यांना प्रेमळ समज दिली. ‘त्यांना’ विरोध करू नका. त्यांच्याशी इतके चांगले वागा की ते हनीमूनलाही इथेच आले पाहिजेत! म्हणजे इथले पर्यटन वाढेल आणि तुमचा रोजगारही! पवार ‘श्रीवर्धन बीच सुशोभिकरणा’च्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.

आजकाल ‘प्रीवेडिंग फोटो / शुटिंग’चे (pre-wedding photo / shooting) प्रस्त फार वाढले आहे. यासाठी लोक चांगल्या लोकेशनच्या शोधात असतात. ‘प्रीवेडिंग फोटो / शुटिंग’साठी श्रीवर्धनचा समुद्र किनारा लोकांचे आकर्षण ठरला आहे. पण स्थानिक लोक या फोटो सेशन/ शूटिंगला विरोध करतात, त्यामुळे वाद होतात कधी कधी भांडण पण होतात. प्रकरण पोलिसात जाते, हे उल्लेखनीय.

श्रीवर्धनच्या विकासासाठी राज्य सरकारने ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. अजित पवार यांनी श्रीवर्धन बीच सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले. बीचची पाहणी केली. ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे (tauktae cyclone) झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. बीच सुशेभिकरण, लॅंडस्केपिंग, झाडांची लागवड, वादळात हॉटेल कसे टिकतील, या सगळ्यांची इंजिनिअरकडून माहिती घेतली. श्रीवर्धन लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, त्यांची कन्या आमदार अदिती तटकरे उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button