अजित पवारांकडून पुण्यात ‘जनता कर्फ्यू’चे संकेत  

Ajit Pawar

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या (Corona) सद्य:स्थितीचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आला. जम्बो सेंटरविषयी सतत तक्रारी येत आहेत; तसेच ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच पुण्यात ‘जनता कर्फ्यू’ लावण्याचे संकेतही दिले.

पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गरज पडल्यास पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करा, अशा सूचना अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. गरज भासल्यास पुण्यात जनता कर्फ्यू लागू करणार, असा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर जनता कर्फ्यू लावणार असाल तर नागरिक, व्यापारी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याकडे लक्ष घालण्याची स्पष्ट सूचनाही अजित पवारांनी केली आहे. दरम्यान, पुण्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) सुरू होणार, अशा बातम्या पेरल्या जात होत्या. पण यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून यात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कुठल्याही अधिकृत घोषणेशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER