अजितदादांनी नागपुरातील कोव्हॅक्सीनचा प्रकल्प पुण्याला पळवला, मंत्री मात्र गप्प

Maharashtra Today

नागपूर :- कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सीन (Covaxin) लसीच्या निर्मितीसाठी नागपूरच्या मिहानमध्ये लवकरच प्रकल्प सुरु करणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले राजकीय वजनाचा वापर करुन हा प्रकल्प पुण्याला पळवला, असा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopade) यांनी केला. तसेच नागपुरातील मंत्री गप्प का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

कृष्णा खोपडे यांनी सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना हा आरोप केला. सिरम आणि भारत बायोटेकला मिहानमध्ये प्रकल्प उभा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांनी ऐनवेळी राजकीय वजनाचा वापर करुन भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात हलवला. हा विदर्भावर अन्याय आहे. यावर नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यासह इतर काँग्रेस नेते मूग गिळून गप्प का आहेत, असा प्रश्न कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केला.

ही बातमी पण वाचा : अजित पवार, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का ? पडळकर भडकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button