फडणवीसांच्या कामांवर समाधानी असल्यानेच अजितदादांनी घेतली होती उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

Devendra Fadnavis - Ajit Pawar Oath

सोलापूर : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या पक्षातील ९० टक्के लोक अजित पवारांच्या (Ajit Pawar) कामावर समाधानी असल्याचा दावा राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केला होता. परंतु, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामावर समाधानी होऊनच भाजपच्या विचाराबरोबर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती हे उमेश पाटील यांना ठाऊक नाही का? असा प्रश्न भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवारांना सल्ला देण्याइतपत चंद्रकांत पाटील यांची पात्रता नाही, अशी टीका केली होती. त्याला देशमुख यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. उमेश पाटील केवळ जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांची भाजप प्रदेशाध्यक्षांबाबत बोलण्याची लायकी नाही. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नेत्यांची मर्जी संपादन करण्यासाठी पाटील असे विधान करत आहेत. कोथरूडच्या मतदारांनी बाहेरून आलेल्या चंद्रकांत पाटील यांना निवडून दिले.

पक्षाचे व त्यांचे स्वतःचे काम असल्याशिवाय पुण्याच्या सुज्ञ मतदारांनी त्यांना निवडून दिले का? त्यामुळे त्यांना उपरा उमेदवार म्हणण्याचा आपणास काय अधिकार आहे? चंद्रकांत पाटील यांनी सलग दोन वेळा पुणे पदवीधर मतदारसंघ मोठ्या मतांनी काबीज केला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार रणांगणात होते. त्यांचा प्रचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार, खासदारांनी केला होता. पण राष्ट्रवादीला त्या ठिकाणी अपयश आले. हे का घडले याचे आत्मचिंतन उमेश पाटील यांनी करावे. उमेश पाटील यांना राज्यपाल नियुक्त आमदाराच्या यादीत नाव न आल्यावर या सर्व आरोपांचा पश्‍चात्ताप नक्कीच होईल, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER