छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील : अजित पवार

chhatrapati shivaji maharaj - Ajit Pawar

मुंबई : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन कुशलतेसह, भविष्याचा वेध घेण्याचे द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण केले .

देशात सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक सणसोहळ्यांवर विरजण पडले असून यंदा शिवराज्याभिषेक दिन मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थित साजरा केला जाणार होत आहे. शुक्रवारी (५ जून) सायंकाळी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ झाला. आज (६ जून) राजसदरेवरील मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER