अर्थ खात्याकडून राष्ट्रवादीला झुकते माप; शिवसेनेचे आमदार नाराज ; भाजप नेत्याचा दावा

Ajit Pawar & Ajit Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) अर्थ खाते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अर्थमंत्री असल्याने त्यांच्या पक्षातील आमदारांची कामे पटापट होतात. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला. त्यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओत म्हटले.

शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळत असून महाविकासआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ आपल्या आमदारांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थखात्याकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपातही अजित पवार यांच्याकडून दुजाभाव केला जात असल्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

भविष्यात शिवसेनेच्या आमदारांकडून कामे झाली नाहीत तर जनतेचा रोष वाढेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही आपल्याला निधी मिळत नाही, याची खंत शिवसेनेच्या आमदारांना वाटते. यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशीच नाराजी होती. आता निधी वाटपावरून शिवसेना नेते नाराज झाले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात महाविकासआघाडीत अशा कुरबुरी सुरुच राहतील. मात्र, शिवसेनेतील अनेक आमदार नाराज आहेत, ही वस्तुस्थिती असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

दरम्यान याआधी लॉकडाऊनचा कालावधी, प्रशासकीय, सनदी आणि पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांवरुन राष्ट्रवादी- शिवसेनेत असलेले मतभेद उघड झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER