जेव्हा अजित पवार आपल्याच सरकारवर प्रचंड संतापले….

ajit pawar-nagpur winter session

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, त्यावेळी सभागृहात ठाकरे सरकारचा एकही मंत्री उपस्थित नव्हता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. हा सर्व प्रकार पाहून अजित पवार यांचा पारा चढला. त्यांनी रागाच्या भरात सभागृहातच आपल्या सरकारला चार शब्द सुनावले. सहापैकी एकतरी मंत्री सभागृहात असायला पाहिजे होता.

मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, असे तुम्हाला कोणी सांगितले होते का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला . दरम्यान अधिवेशनाची सुरुवातीपासूनच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करत विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.

शरद पवारांचे विधान ; अजित हार्ड वर्कर, प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची त्याच्यात क्षमता

या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करतील, असा अंदाज आहे. अजित पवार यांनीही सभागृहात येण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलचे संकेत दिले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बातमी मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही त्यांनी म्हटले.