राज ठाकरेंच्या मागण्यांबाबत अजित पवारांनी दिले त्वरित निर्देश

Raj Thackeray & Ajit Pawar

मुंबई : महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ कर, तसेच बचतगटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या दंडेलशाहीविरुद्ध कठोर पावलं उचला, या मनसेच्या मागणींबाबत तातडीने पावले उचला, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. आज मनसेच्या (MNS) शिष्टमंडळाने याबाबत पवारांची भेट घेतली होती.

सध्या कमी-जास्त प्रमाणात सगळीकडे आर्थिक संकट आहे. गेली अनेक वर्षे महिला बचत गटाद्वारे राज्यातील लाखो महिला कष्ट करून स्वतःच्या पायावर उभ्या राहत असताना कोरोनामुळे मागील ७-८ महिन्यात ही सगळी घडी विस्कळीत झाली. या महिला बचतगटांनी मायक्रो फायनान्स कंपनी कडून घेतलेले कर्ज ते वर्षानुवर्षे नियमितपणे फेडत असताना सध्याच्या या कर्जाची परतफेड ही अशक्य आहे. त्यामुळे संबंधित महिलांचे कर्ज माफ करा, असे निवेदन मनसेने अजित पवार यांना दिले.

पोलीसाना मार्च २०१९ पासून गृहकर्ज देणे बंद झाले झाले. अडीच हजार पोलिसांना मंजूर झालेले गृहकर्ज देण्यात आले नाही त्यामुळे शेकडो पोलीसांची आर्थिक अडचण झाली आहे. मंजूर झालेले गृहकर्ज पोलिसांना देण्याची मागणी मनसेने केली. अजित पवार यांनी गृहसचिव सीताराम कुंटे यांना बोलवून हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश दिले, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विविध मागण्या ठाकरे सरकार मान्य करते आहे. याआधी मुंबईचे डबेवाले राज ठाकरेंना (Raj Thackeray) भेटले आणि लगेचच त्यांना रेल्वेने प्रवासाची परवानगी मिळाली. जिमच्या बाबतीतही तसेच झाले. राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यात यावीत, यासाठी ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक मंडळाने अलीकडेच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर राज ठाकरेंच्या पुढाकाराने ग्रंथालयांची दारेही सरकारने उघडली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER