अजित पवारांना झोपेत सरकार बनवता आले, मात्र टिकवता आले नाही – चंद्रकांत पाटील

Ajit Pawar - Chandrakant Patil

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात सुरू असलेली शाब्दिक चकमक अद्यापही सुरुच आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांidpच्या ‘पहाटेच्या सरकार’वरुन आता या दोन नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु असल्याचं असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) झोपेत असतानाच पडेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर अजित पवार यांनी ‘मी रोज रात्री झोपेतून उठून टीव्ही बघतो आणि पाहतो की, सरकार पडलं की काय?’ असा टोला लगावला होता. आता चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा अजितदादांना प्रत्युतर दिलं आहे.

अजित पवार यांना झोपेत सरकार बनवता येतात ते माहिती आहे. मात्र ते टिकवता येत नाही. ५४ आमदारांच्या सह्यांचं पत्र ड्रावरमधून कुणी काढलं? राज्यपालांना कुणी सांगितलं की ५४ आमदारांचे समर्थन आहे? अशाप्रकारे सरकार स्थापन करणाऱ्यांनी खरं तर जपून बोललं पाहिजे, असे खोचक उत्तर चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांना दिले.

ही बातमी पण वाचा : अशोक चव्हाणांचा राजीनामा भाजप नव्हे तर, मराठा समाज मागेल – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button