अजित पवार यांनी पहिल्यांदा आपल्या बंडावर भाष्य केले

Ajit Pawar

पुणे : आता पक्षांतर करणा-यांना किमान वर्षभर तरी आपल्या पक्षात स्थान घेऊ नका, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदा आपल्या बंडावर भाष्य केले. ते म्हणाले, शरद पवार आणि जयंत पाटील यांनी माझ्याबाबतीत निर्णय घेतला म्हणून इथे उभा आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्यातील अनेकांनी पक्षाविरोधात काम केले. अनेकजण पक्ष सोडून गेले. तरीही आपल्या चांगल्या जागा आल्या.

दरम्यान भाजपासोबत जाण्याच्या त्या निर्णयानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले. अजित पवार यांनी जेव्हा स्वतःच्या बंडाबाबत भाष्य केले तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. मात्र पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसने शरद पवारांप्रमाणे ताकद पणाला लावली असती तर चित्र वेगळे असते : अजित पवार

एक कार्यकर्ता मध्येच उठून म्हणाला, दादा संजय काकडेंवर बोला, या कार्यकर्त्यांच्या मागणीवर, मी बघायला जाईन तेव्हा तू सोबत चल, माझे दोन डोळे अन तुझे दोन डोळे असे चार डोळे बघतील. असे अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. पुण्यात अजित पवार हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना. ते बोलत होते.

अजित पवार यांच्या भाषणाच्या दरम्यान अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरातील समस्या सांगत होते. पुण्यात आयोजित मेळाव्यात त्या प्रत्येकाला आपण करू, होईल असे अजित पवार सांगत होते. त्याच दरम्यान एक जण म्हटला दादा, हे सगळे प्रश्न सोडवण्याआधी तुम्ही पालकमंत्री व्हा, यावर अजित पवार म्हणाले, अरे बाबा एवढे सगळे सांगतो म्हणजे, मीच पालकमंत्री होणार आहे. म्हणूनच सांगतोय ना बाबा असे अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे.