अजितदादांकडून जयंत पाटील यांची पाठराखण, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या वादावर म्हणाले…

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच ठिणगी पडल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावल्याने मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच मुख्य सचिव कुंटे यांच्यावर जयंत पाटील नाराज असून, त्यांच्याठिकाणी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्याच्या मागणीवरुन मुख्यमंत्री आणि पाटील यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. दरम्यान या संपूर्ण वादावर मौन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जयंत पाटील यांची बाजू घेतली.

पत्रकारांनी याबाबत प्रश्न उपस्थित करताच अजित पवार म्हणाले, “एक मिनिटं… हे माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात असेल, तर त्याचं योग्य उत्तर जयंत पाटीलचदेऊ शकतील. जयंत पाटील खूप वरिष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याचं अर्थ, गृह, ग्रामविकास मंत्रालय सांभाळलं. आता ते जलसंपदा मंत्रालय सांभाळत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत बघितली, तर ते अतिशय संयमी स्वभावाचे आणि अधिकाऱ्यांकडून काम करून घेणारे आहेत. उलट जरा तापट स्वभावाचा कडक बोलणार मीच आहे. ते तर एकदम माझ्याविरुद्ध आहेत.

मात्र या बातम्या माध्यमांमध्ये कशा आल्या, कधी आल्या याची कल्पना नाही. ज्याला महत्त्व द्यायला नको, त्यालाच आपण महत्त्व देत आहोत. त्यामुळे लोकांच लक्ष तिकडे जातं. माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की, यामध्ये काही तथ्य नाही. हा प्रशासनाचा भाग असतो. प्रशासनातील मुख्यमंत्री आणि मंत्री तसेच मुख्य सचिव आणि अधिकारी. आम्ही काही पहिल्यांदाच मंत्री झालेलो नाही, अनेक वर्ष आम्ही प्रशासन चालवलं आहे, असं म्हणत अजित पवार यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आम्ही कटीब्ध आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एका दिवसाचं अधिवेशन घेण्याचीही आमची तयारी आहे, असं पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button