साताऱ्यासाठी जे कोणाला नाही जमलं, ते अजित पवारांनी करून दाखवलं

Ajit pawar

सातारा :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची कृष्णनगर परिसरातील ६४ एकर जागा देण्यात यावी, त्याबदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील ७० एकर शासकीय जमीन जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यासाठी अजित पवार यांनी गुरुवारी विधान परिषद सभापतींच्या दालनात झालेल्या विशेष बैठकीत निर्णय घेतला.

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ही सातारावासियांची सर्वात मोठी गरज आहे. यासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही. जिल्ह्यातील सध्या उपलब्ध असलेली आरोग्य यंत्रणा उपयोगात आणून पुढील शैक्षणिक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे. असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अनेक दिवसांपासून शासन दरबारी रखडलेला होता. जानेवारी २०१२ मध्ये साताऱ्यात ४१९ कोटी खर्चाचे शंभर खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले होते. मात्र, ते कागदोपत्रीच राहिले होते. यासंबंधीचा प्रस्ताव आज (३ जुलै) नियामक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. तिथे मंजूर झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यास मान्यता घेण्यात येणार आहे. यामुळे हा प्रश्न आता निकाली निघाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER