अजित पवार – देवेंद्र फडणवीसांमध्ये खडाजंगी ; मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चावरून वादंग

Devendra Fadnavis - Ajit Pawar

मुंबई :- मंत्र्यांचे बंगले आणि मंत्रालयातील त्यांच्या दालनांवर ९० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर वादंग पेटले आहे . यावर मी माहिती घेतली. खर्चाचा हा आकडा चुकीचा आहे, हे आकडे येतात कुठून, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. बंगल्यांवर नेहमीच कामे सुरू असतात, डागडुजीही होत असते, पण राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसताना एवढा खर्च करणे उचित नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणे हे सरकार कंत्राटदारधार्जिणे असल्याचे लक्षण आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली. आरोग्य विभागाच्या तरतुदीतील ५० टक्केही निधी खर्च केलेला नाही. मात्र, बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला, असे दरेकर म्हणाले.

मंत्र्यांचे बंगले ही त्यांची खासगी मालमत्ता नाही. ते जुने असल्याने दर दोन-तीन वर्षांनी त्यांची डागडुजी करावी लागते, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले .

मंत्री (बंगल्याचे नाव) मंजूर खर्च – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- (वर्षा) ३.२६ कोटी रु. नवाब मलिक- (मुक्तागिरी) ८८ लाख अनिल देशमुख- (ज्ञानेश्वरी) १ कोटी १ लाख सुभाष देसाई- (शिवनेरी) १ कोटी ४४ लाख नितीन राऊत- (पर्णकुटी) १ कोटी २२ लाख राजेश टोपे- (जेतवन) १ कोटी ३० लाख डॉ. राजेंद्र शिंगणे- (सातपुडा) १ कोटी ३३ लाख एकनाथ शिंदे- (नंदनवन) २ कोटी ८० लाख बाळासाहेब थोरात- (रॉयलस्टोन) २ कोटी २६ लाख अजित पवार-(देवगिरी) १ कोटी ७८ लाख छगन भुजबळ- (रामटेक) १ कोटी ६७ लाख जयंत पाटील- (सेवासदन) १ कोटी १९ लाख दिलिप वळसे पाटील- (शिवगिरी) ९३ लाख अशोक चव्हाण- (मेघदूत) १ कोटी ४६ लाख देवेंद्र फडणवीस- (सागर) १ कोटी ४ लाख.

ही बातमी पण वाचा : …तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते ;  शिवसेनेची टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER