‘मी बांगड्या घातलेल्या नाही, कोणी दम दिला तर त्याच्या खानदानाला बघतो’ – अजित पवार

Ajit Pawar

अहमदनगर : कर्जत-जामखेड या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी खर्डा येथे सभा घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘मी आरे ला कारे म्हणणारा माणूस आहे. हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. जर कोणी दम दिला तर त्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो’ अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा नाव न घेता समाचार घेतला.

ही बातमी पण वाचा : ‘मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चा अध्यक्ष आहे, याचा विरोधकांना विसर’ – शरद पवार

यावेळी बोलताना त्यांनी ‘आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला कोणी धक्का लावला, तर त्यांच्याकडे बघून घेईन. मी लोकशाही मानणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मानणारा आहे. मी घटना-कायदा मानणारा आहे. आमचे कार्यकर्ते जर नीट आचारसंहितेचं पालन करत असतील आणि कोण बाहेरचे आणले, तर मलाही जशास तसं उत्तर देता येतं.’ असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

रोज अपघातात जीव जातायेत. मुलं-बायका मरत आहेत तरी सरकारला खड्डे बुजवता येत नाही. यांनी वीज, खतं सगळ्याची किंमत वाढवली. पण, ज्वारी, कांदा, टॉमेटोला भाव दिला नाही. ‘आई जेवू घालेना, बाप भीकृ मागू देईना’ अशी अवस्था यांनी सर्वांची केली आहे. जामखेडमधलं उडीद,तूर,हरभरा धान्याच्या फेडरेशनमार्फत इथल्या मंत्र्यांनी जवळच्या कार्यकर्त्यांना खरेदी केंद्र सुरू करायला सांगितले.त्याद्वारे तालुक्यातल्या लोकांची लूट केली.असल्या माणसाला तुम्ही विधानसभेत पाठवणार का?पिण्याच्या पाण्याच्या टँकर व्यवहारातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला.

माझं २००१ सालचं कुकडीच्या पाणी वापराच्या संदर्भातलं एक पत्र सध्या वायरल होतंय. तेव्हा आमच्या प्रयत्नातून पाणी सीना धरणात आणून दुष्काळी भागाला दिलं होतं. गेल्या ५ वर्षात कर्जत-जामखेडच्या मंत्र्यांनी कोणतं सिंचनाचं काम केलं? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.