मंत्रिमंडळाबाबत डिसेंबरअखेर पूर्ण चित्र स्पष्ट होईल : अजित पवार

ajit-pawar

मुंबई : दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप जाहीर झालं. नागपूरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं खातवाटप करण्यात आलं आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा असून, ते हिवाळी अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे.यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली .

सध्याचं मंत्रिमंडळ हे काही काळापुरतं आहे. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. अजित पिंपरी-चिंचवड येथे आले होते, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टीनेही पावलं टाकली जात आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं. भाजपमधील अंतर्गत वादावर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

वाढदिवशी पवारांशी बोलून उदयनराजेंनी मन हलके केले!

राज्यात सध्या मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. सात मंत्री अधिवेशनापुरता कारभार करु शकतात. मात्र सात मंत्री राज्याचा कारभार पाहू शकत नाहीत. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, कुणाकुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, याचा निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख बैठक घेऊन निर्णय घेतील. सध्याचं मंत्रिमंडळ हे काही काळापुरतं आहे. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असं अजित पवारांनी सांगितलं.

तसेच शेतकरी अडचणीत आहे, त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी ठोस असा निर्णय घ्यावाच लागेल. कर्जमाफीचा निर्णय हा विधिमंडळात घेतला जातो. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टीनेही पावलं टाकली जात असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली .