अजित पवारांनी राज्यातील १३ साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले; गोपीचंद पडळकरांचा आरोप

Gopichand Padalkar-Ajit Pawar

पंढरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील १३ साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले, असा आरोप भाजपचे (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. ते बुधवारी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Pandharpur-Mangalvedha Assembly by-election) प्रचाराच्या सभेत बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत पवार कुटुंबीयांवर ताशेरे ओढले . शरद पवार यांचं अख्खं कुटुंब सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आलं आहे.

मात्र, त्यांना या पंढरपूर-मंगळवेढ्याच्या निवडणुकीशी (Pandharpur Bypoll) काहीही देणं-घेणं नाही. त्यांचा डोळा हा विठ्ठल कारखान्यावर आहे. हा कारखाना त्यांना घशात घालायचा आहे. काही दिवसांपूर्वीच करारपत्र करून आदिनाथ कारखाना पवारांच्या नातवाने घशात घातला, अशी टीका त्यांनी केली . राज्यातील शेतकरी आणि सभासदांच्या पैशांवर हे साखर कारखाने चालतात. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचं मंगळसूत्र मोडून या कारखान्यांमध्ये पैसे भरले आहेत. जवळपास ३०० ते ४०० कोटींची संपत्ती असणारे हे कारखाने अजित पवार यांनी पाच, सहा, दहा कोटी, अशा कवडीमोल दराने विकत घेतले आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. या आरोपांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी हे पांढऱ्या पायाचं सरकार आहे. भाजपमध्ये सर्वांत जास्त आमदार हे मराठा आणि ओबीसी समाजाचे आहेत.

तरीदेखील महाविकास आघाडीचे नेते भाजप जातीयवादी असल्याचे आरोप करतात. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. गरिबाच्या पोराला भाजपने मंत्री केल्याची अनेक उदाहरणे आहेत. सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर ही त्याची उदाहरणे आहेत. याउलट महाविकास आघाडी सरकारमध्ये घराणेशाही आहे, असे पडळकर यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button