‘माळेगाव’वर पुन्हा अजितदादांची पकड ; कारखान्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व

ajit-pawar-brought-power-malegaon-sugar-factory

मुंबई/बारामती : बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये एकूण 21 जागांपैकी आतापर्यंत 7 जागांचा निकाल लागला आहे. या निवडणुकांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पॅनलने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निलकंठेश्वर पैनलला 11 जागा मिळाल्या आहेत. तर सहकार बचाव शेतकरी पैनलला 5 जागा विजयी झाल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राज्यात २०१४ मध्ये सत्ताबदल झाल्यावर २०१५ मध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी राष्ट्रवादीच्या पॅनलचा पराभव केला होता. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची रसद त्यांना मिळाली होती. त्यामुळे या वेळी पवार यांनी संपूर्ण ताकद लावली होती. या पराभवाचा वचपा पवार यांनी काढला. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा तालुक्यातील महत्वाच्या सहकारी संस्थेवर वर्चस्व मिळविण्यात अजित पवार यशस्वी झाले आहे.

…अन्, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उध्दव ठाकरेंची बाजू घेत भाजपाचे कान टोचले!