…आता अजित पवारांवर पुष्पवृष्टीसाठी हेलिकॉप्टर सज्ज!

Ajit Pawar Helicopter

मुंबई :- राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज बारामतीत येत आहेत. यापार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी तीन वाजता बारामती शहरातून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील शारदा प्रांगणात नागरी सत्कार होणार आहे. यावेळी त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला खडेबोल

पवार हे राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. अजित पवारांनी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1 लाख 65 हजार मतांनी पराभव केला. अजितदादांच्या या सर्वात मोठ्या विजयानंतर त्यांच्या बारामतीत सेलिब्रेशनही जंगी होणार आहे.

ही बातमी पण वाचा : रेडीरेकनर दरात सुसुत्रता, सुसंगतपणा आणण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

दरम्यान अजित पवारांचे पुतणे रोहित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले, त्यावेळी तब्बल 30 जेसीबीवरुन गुलाल उधळून त्यांची मिरवणूक निघाली होती. आता अजित पवारांची मिरवणूक काढण्यात येणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.