कोरोनावर मात करुन अजितदादा पुन्हा कामाला, सुप्रिया सुळेंनी शेअर केला लाईव्ह व्हिडीओ

Ajit Pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोनावर (Corona) मात करुन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. अजितदादांनी सोमवारी मंत्रालयातून आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट मंत्रालयातून एक व्हिडीओ लाईव्ह केला.

नेहमीप्रमाणे अजितदादा सोमवारी मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले होते. हातात ग्लोज आणि तोंडावर मास्क बांधून अजितदादांनी आपल्या कामाला सुरुवात केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादा काम करत असताना एक व्हिडीओ फेसबुकवर लाईव्ह केला आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना जाऊन एक निवेदन दिले आहे. पण, जेव्हा अजितदादांनी सही करण्यासाठी पेन मागितला तेव्हा सुप्रिया सुळेंनी आपल्याकडील पेन दिला. त्यावेळी ‘माझ्या पेनमध्ये सॅनिटाझर आहे’, असं सांगत अजितदादांची चेष्टा केली. तसंच, डॉक्टरांनी काम करण्यास सांगितले का? असं सुप्रिया सुळेंनी विचारले असता, अजितदादा म्हणाले की, ‘आज मंत्रालयात काम करणार आहे. नंतर पुण्याला जाणार आहे आणि तिथून बारामतीला जाईल.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER