अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीबाबत महत्त्वपूर्ण बैठक

ajit pawar

पुणे : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या आषाढी वारीबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सर्व पालख्यांचे सोहळा प्रमुख तसेच मानकऱ्यांची भूमिका ऐकून घेऊन सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी ४ वाजता ही बैठक पार पडणार आहे.

अजित पवार यांनी याअगोदरही या संदर्भात बैठक घेतली होती . त्या बैठकीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून व विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे, याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाउनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखी सोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोलापूर, सातारा व पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळयाबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यांनतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आज होणाऱ्या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे आयुक्त, पिंपरी पोलीस आयुक्त संदिप बिष्णाई, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप पाटील, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे, देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे महाराज, संत सोपानकाका विश्वस्त गोपाळ गोसावी महाराज, पंढरी देवस्थानचे विश्वस्त शिवाजी मोरे महाराज, इत्यादी मंडळींसोबत प्रमुख वारकरी उपस्थित असतील.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER