अजित पवारांनी आदित्य ठाकरेंना मानला आपला लेक, म्हणाले, ‘शेवटी माझ्या लेकानेच’…

Ajit Pawar-Aditya Thackeray

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची ऐतिहासिक इमारत आता सर्वसामान्य नागरिकांनाही बघता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीत सर्वसामान्यांसाठी हेरिटेज वॉकची सुविधा सुरु केली आहे. मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या हेरिटेज वॉकचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात अजित पवार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कामांचं कौतुक करत माझा लेक असल्याची पुस्तीही जोडली.

यावेळी पवार म्हणाले की, मुंबई महापालिकेत यापूर्वी कधीही येण्याची संधी मिळाली नव्हती. ही संधी आज आदित्य ठाकरेंमुळे मला मिळाली आणि इथे येता आलं. कधी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना वाटलं नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. त्यांना ही इमारत दाखवावी. मी हे लक्षात ठेवेन. शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि मुंबई महापालिका यांनी पुढाकार घेतल्याने महापालिका मुख्यालयाचं दर्शन हेरिटेज वॉकची संकल्पना राबवली जात आहे. हेरिटेज वॉकल मराठी शब्द शोधला पाहिजे. कारण आपण मराठीचे पुरस्कर्ते आहोत. मुंबई महापालिकेची टोलेजंग आणि ऐतिहासिक इमारत बघणं आणि सव्वाशे वर्षांपूर्वीच्या वास्तुकलेचा अनुभव सर्वसामान्यांना घेता येणार आहे. मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणबाबत ज्या वास्तूत निर्णय घेण्यात आले त्या वास्तूच्या इतिहासाशी समरस होण्याची संधी या निमित्ताने सर्वसामान्यांना मिळणार आहे. मी आदित्य ठाकरे आणि आदिती तटकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी खरंच एक चांगला विचार केला, असं अजित पवार म्हणाले.

पर्यटन मंत्री चांगलं काम करत आहेत. नुकतंच पुण्यात आपण जेल टूरिझमसुद्धा आपण सुरू केलं आहे. पुण्याच्या जेलला एक इतिहास आहे. ही सुरुवात आहे. मुंबईच्या लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या लढवय्यांचे मोठं योगदान आहे. मुंबईच्या माणसात हा सर्व संकट परतून लावण्याची ताकद आहे. मुंबई महापालिका ही शिवसेनेकडे आहे. मुख्यमंत्री सेनेचा आहे. मुंबईचा चेहरामोहरा एकदम बदलता येणार नाही पण मुंबईच्या रस्त्यावरील टपऱ्या बकालपणे दिसतात. यात बदल केला गेला पाहिजे, असं पवार यांनी सांगितलं.

मुंबईची नाईट लाईफ एक वेगळा प्रकार आहे. आजच्या तरुणांना ही योजना आवडेल. पण यात योग्य सुरक्षा पुरवू. काही लोक याला विरोध करतील पण मुंबईला नाईट लाईफची गरज आहे, असं मतही व्यक्त करत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेचं समर्थन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER