अजित पवारांच्या गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळं देण्याची भाजपची तयारी!

Ajit Pawar-CM Fadnavis

मुंबई : राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी 23 नोव्हेंबरला पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे एकूण 27 आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. अजडित पवार गटातील या 27 आमदारांना भाजपने मोठी ऑफर दिल्याची माहीतीही मिळत आहे. अजित पवारांच्या गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळं देण्याची तयारी भाजपने दर्शवल्याची माहिती आहे.

रवीवारी अजित पवार शपथविधीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गेले. रात्री दहा वाजताच्या सुमारास दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार पुन्हा आपल्या निवासस्थानी परतले.

अजित पवारांना अडीच वर्षे मुंख्यमंत्री पद देण्यास शिवसेना तयार?

अजित पवार ‘वर्षा’वर मंत्रिपदांच्या वाटाघाटीसाठी आल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. बैठकीला भाजपकडून विनोद तावडे, भूपेंद्र यादव आणि गिरीश महाजन यांचीही उपस्थिती असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्याचं जाहीर करण्यात आलं. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी चर्चा झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. मुख्य सचिव आणि वित्त सचिवांशी यावर सविस्तर चर्चा होईल असंही ट्वीटमध्ये म्हटलं आहे.