
पुणे : पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) सध्या भाजपची सत्ता आहे. नुकतेच माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे महापालिकेतील विकास कामांचा आढावा घेतला. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा भाजपच बाजी मारेल का अशी चर्चा सुरू झाली. मात्र, यंदा पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता खेचून आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही दंड थोपटले आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ता ‘खेचून’ आणणार असे अजित पवार यांनी जाहीर केले. त्यासाठी पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या २३ गावांच्या समावेशाची प्रक्रिया ‘योग्य’ वेळी पूर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले, ‘सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत येणारच असे म्हणत असतो, तर विरोधी पक्ष सत्ता खेचून घेणार, असे म्हणतात. तसे मीदेखील म्हणतो, की पुणे महापालिकेवर सत्ता ‘खेचून’ आणणार.’
तसेच, सर्वच प्रयत्न करणार. यापूर्वी पक्ष सोडून गेलेल्यांचा विचार करून एक-एक पाऊल उचलले जाणार आहे. मात्र, कोण निवडून येऊ शकतो, हे पाहूनच निर्णय घेण्यात येणार आहेत.’ असेही अजित पवार यांनी सांगितले.
ही बातमी पण वाचा : भाजपच्या सत्तेचा डाव मोडला म्हणून संधी मिळेल तेव्हा आडवे जाणे घटनेच्या कोणत्या कलमात बसते? – सामना
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला