ईडी सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार; अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ajit-pawar-again-get-into-trouble-ed

मुंबई : सिंचन घोटाळा (irrigation-scam) प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडी (ED) अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने जलसंपदा विभागाला एक नोटीस बजावली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने कोकणातील सिंचन प्रकल्पांची माहिती मागितली आहे. येत्या 21 ऑक्टोबरला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीला हजर राहण्याबाबत ईडीने जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना समन्स बजावला आहे.

जलसंपदा विभागाकडे 2009 पासून वाढीव प्रकल्प खर्च मान्यता, टेंडर, आर्थिक व्यवहार यांची माहिती ईडीने मागितली आहे. तसंच या संदर्भात अधिकाऱ्यांची चौकशी ही केली जाणार आहे.

दरम्यान ,महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांच्यासह इतरांना एसीबीने क्लिन चिट दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER