पवार साहेब ऐंशीत, मी साठीत, सुप्रिया पन्नाशीत पण … ; अजितदादांच्या कारकर्त्यांना सल्ला

Sharad Pawar - Ajit Pawar - Supriya sule

मुंबई : साहेब ऐंशी वर्षांचे झाले… मी साठीत आलो… सुप्रिया पन्नाशीत… पण वय वाढतंय तसं आमचा काम करण्याचा उत्साह वाढतोय… तुमच्यासाठी असंच कार्यरत राहून राज्यातील पहिला क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून बारामती बनवू एवढीच ग्वाही देतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले .

पवार यांच्या हस्ते बारामतीत पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजितदादांनी त्यांना खडेबोल सुनावले . तसेच त्यांना फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. शिवाय राष्ट्रवादीला नंबर वनचा पक्ष करण्यासाठी कंबर कसून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

काहीजण माझ्याजवळ येतात. फोटो काढतात. आताच दादांना भेटलो. चल तुझं काम करून देतो म्हणतात. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. कोणी असं करत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा देतानाच कोणत्याही एखाद्या योजनेसाठी कोणी पैसे मागत असेल तर लगेच सांगा, बघतो त्याच्याकडे, असा सज्जड दमही अजितदादांनी भरला. पदाधिकाऱ्यांनी या योजनेचा फायदा सर्वतोपरी होण्यासाठी प्रयत्न करावा. जनतेला या योजनेचा लाभ मिळू द्या. कोणाकडे पैसे मागू नका. असे काही निदर्शनास आले तर जेलची हवा खावी लागेल. चक्की पिसींग ॲन्ड पिसिंग, असा दमच अजितदादांनी भरताच त्यावरही एकच हशा पिकला.

अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना कोरोनापासून (Corona) सावध राहण्याच्या सूचना केल्या. अजूनही कोरोनाबद्दल काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा. तुम्हाला स्पष्ट ऐकता यावं यासाठी मी मास्क काढलाय. भाषण झालं की पुन्हा मास्क घालणार. तुम्हीही सर्वजण दक्षता घ्या. परदेशात सध्या परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आपणही दक्षता घेण्याची गरज आहे. सध्या आपल्याकडे कोरोनाचे प्रमाण कमी झाले . त्याचे सर्व श्रेय कोरोना योद्ध्यांचे आहे, असे सांगतानाच नाव चुकल्यामुळे मी जरा चिडलो. काम चांगले झाले की बरं वाटते . नाहीतर चिडावं लागते . तुम्ही म्हणाल, हा बाबासारखाच चिडतो, असे अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER