बाळासाहेब ठाकरे पुतळा अनावरण कार्यक्रमात अजित पवारगैरहजर!

Ajit Pawar absent from Balasaheb Thackeray

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी, आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत झाले. या कार्यक्रमाला राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसह विरोधी पक्षातील नेतेही हजर होते. मात्र उमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते.

कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, एकनाथ शिंदे, अनिल देसाई हे नेतेही उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीच्या पाहणीसाठी ते त्याच दिवशी पुण्यात दाखल झाले होते. त्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील विविध कामांचा आढाव घेतला व आज ते बारामतीकडे रवाना होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER