डोवाल यांनी हिंदू-मुस्लिम वस्त्यांमध्ये साधला संवाद

Ajit Doval- Delhi Violence

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज बुधवारी सायंकाळी ईशान्य दिल्लीतील हिंदू-मुस्लिम वस्त्यांमध्ये भेट दिली. या भेटीत त्यांनी सर्वसामान्यांशी संवाद साधला. डोवाल यांचे आगमन होताच, लोकांनी आनंद व्यक्त केला.

दिल्लीच्या दंगली कोण पेटवत आहे?

ईशान्य दिल्लीतील मौजपूरमध्ये हिंसाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. आज सायंकाळी डोवाल यांनी या भागास भेट देऊन लोकांना धीर दिला. यावेळी लोकांशी बोलताना ते म्हणाले, मनात प्रेमाची भावना कायम ठेवा. देश एक आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना डोवाल म्हणाले, मला सुरक्षा यंत्रणांवर पूर्ण विश्वास असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

सीएएविरोधातील आंदोलनात हिंसाचार झाल्याने केंद्र सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर विश्वास टाकला आहे,हे येथे उल्लेखनीय.