दिल्लीतही अजितदादांचा रुबाब; ठाकरे-मोदींच्या भेटीइतकीच दादांच्या वेगळ्या लूकचीही चर्चा

Maharashtra Today

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी राजधानी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री अशोक चव्हाणही होते. मात्र मंगळवारी दिवसभरात ठाकरे-मोदींच्या भेटीइतकीच (Thackeray-Modi meeting) अजितदादांच्या वेगळ्या लूकचीही चांगलीच चर्चा होती. मोदींची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकार परिषद घेतली.

भेटीत काय मागण्या केल्या गेल्या, मोदींचा काय प्रतिसाद होता याबाबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. पण आणखी एका गोष्टीवर मोठा खल केला जातोय आणि ती गोष्ट आहे फोटो. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान भेटीचा जो फोटो माध्यमांना देण्यात आला आहे, त्या भेटीचा फोटो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. महाराष्ट्रात ज्या एका फोटोची चर्चा आहे तो हाच फोटो. ह्या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण आहेत. या फोटोत नेत्यांची जी देहबोली आहे त्यावर बरीचशी चर्चा रंगते आहे.

ही चर्चा नेमकी कशी झाली असावी, देहबोली सकारात्मक आहे की नकारात्मक यावरही खल केला जातो आहे. विशेष म्हणजे ह्या फोटोत सर्वांचं लक्ष वेधलं आहे ते अजित पवारांनी. त्याचं कारणही खास आहे. नेहमी पांढऱ्या कपड्यात वावरणारे अजित पवार ह्या फोटोत मात्र एकदम सुटाबुटात दिसून येत आहेत. तर दुसऱ्या फोटोत महाराष्ट्र सदनामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याआधी ते सुटाबुटात दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button