अजित पवारांच्या बारामतीत जनता कर्फ्यू वाढवला : २० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन

Lockdown In Baramati Extended Till 20 September - Ajit Pawar

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . शरद पवारांच्या (Sharad Pawar) बारामतीतही (Baramati) कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे . हे लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सुचनेनुसार बारामती शहर तालुक्यात ७ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या जनता कर्फ्यूची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे २० सप्टेंबरच्या मध्यरात्री पर्यंत सर्व व्यवसाय बंद राहणार आहेत.

‘माझे कुटुंब , माझी जबाबदारी ‘ ही मोहीम राबविली जाणार आहे. १ सप्टेंबर पासून शहर, तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रविवार (दि. १३ ) पर्यंत कोरोना रुग्ण संख्येने दोन हजारचा आकडा ओलांडला आहे. रुग्णसंख्या २०५५ वर पोहचली आहे. रुग्ण संख्येचा आलेख चढता राहिल्याने जनता कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेंतर्गत बारामती शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी होणार असल्याचे प्रशासनाकडुन कळविण्यात आले आहे. बारामती नगर परिषदेचे ६४० कर्मचारी घरोघरी जाऊन ऑक्सिजन लेव्हल व थर्मल स्क्रिनिंग ची टेस्ट करणार आहेत. तर संशयितांची अँटिजेंन रॅपिड टेस्ट केली जाणार आहे.

७ सप्टेंबर पासूनच प्रशासनाने कडक निर्बंध लागू करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला होता. मात्र, व्यापाऱ्यांनी हा निर्णय एकतर्फी असल्याचे सांगत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर जनता कर्फ्यू सात दिवसांचा करण्यात आला होता. परिस्थिती न सुधारल्यास मुदत वाढविण्यात येईल, असा इशारा देखील प्रशासनाने दिला होता. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येत वाढ सुरूच राहिली. परिणामी जनता कर्फ्यू मुदत वाढवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER