पूर्ण कारकिर्दीत जे ‘सचिन’ला ही जमले नाही तो विक्रम ‘अजित आगरकर’ने केला आहे; जाणून घ्या कोणता ?

Ajit Agarkar - Sachin Tendulkar

पूर्ण कारकिर्दीत जे सचिन ला व इतर भारतीय फलंदाज यांना जमले नाही ते अजित आगरकर ने केले आहे, क्रिकेटच्या नावाजलेल्या इंग्लडच्या लॉर्ड मैदानात त्याने शतक ठोकले आहे.

लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन, इंग्लंड:

लॉर्ड्स (होम ऑफ क्रिकेट) येथे कसोटी शतक झळकावणे नेहमीच प्रत्येक खेळाडूसाठी त्यांच्या कारकिर्दी मध्ये खास ठरले आहे. लॉर्ड्स ऑनर बोर्डवर त्याचे नाव कोरले असेल असे कोणाला नाही वाटत. लॉर्ड्समधील शतक एखाद्या खेळाडूच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रकाश टाकतो आणि नंतर त्याच्याकडे विशेष खेळाडू म्हणून पाहिले जाते. लॉर्ड्स येथे बर्याच खेळाडूंनी शतके केली आहेत आणि खेळामध्ये विलक्षण स्थान मिळवले आहे, परंतु खेळाच्या काही महान व्यक्ती देखील आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीही तीन आकडी धावा (शतक) केल्या नाहीत आणि क्रिकेटचा देवता म्हणून ओळखणारा सचिन तेंडुलकर त्यापैकी एक आहे.

लॉर्ड्सच्या ऑनर बोर्डवर नऊ भारतीय फलंदाजाचे नाव आहे – विनू मानकड, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, रवि शास्त्री, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अजिंक्य रहाणे आणि अजित आगरकर.

या भारतीय गोलंदाजाने फलंदाजीमध्ये असे काम केले जे अगदी सचिन, युवराज, रोहितलादेखील नाही जमले

२००२ मध्ये भारत इंग्लंडच्या दौर्याची पहिली कसोटी पाहुण्यांसाठी इतका खास सामना नव्हता, परंतु अजित आगरकरसाठी ती नक्कीच संस्मरणीय होती. दोन दिवसांत 568 च्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना, भारताला कधीही जिंकण्यासारखे किंवा कसोटी वाचविण्यासारखे वाटले नाही. चौथ्या दिवशी खेळ संपण्यापूर्वी सहा विकेट गमावल्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा आगरकर २८ धावांवर फलंदाजीला आला तेव्हा शेवटच्या दिवशी त्याने आपले पहिले शतक घडण्याची अपेक्षा अनेकांनी केली नव्हती, असे मानणे योग्य आहे. त्याने १९० चेंडूंत १०९ धावा केल्या त्यामध्ये १६ चौकारांचा समावेश होता. दुर्दैवाने भारताला ते धावा पुरेसे नव्हते कारण कसोटीत १७० धावांनी पराभव पत्करावा लागला.

संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला एक उत्कृष्ट गोलंदाजाबरोबरच खालच्या फळीतील उत्तम फलंदाजदेखील म्हटले जात होते. त्याच्या नावावर वनडेत सर्वात वेगवान ५० विकेट्स घेण्याचा विक्रम होता. तसेच खूप कमी लोकांना माहिती असेल की, कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आगरकरला मुंबईचा पुढील सचिन तेंडुलकर म्हटले जात होते. आपल्याला सचिन का म्हटले जात होते याबद्दल ४२ वर्षीय आगरकरने आपला माजी संघसहकारी आकाश चोपडाबरोबर ‘आकाशवाणी’ कार्यक्रमात सांगितले आहे.

“खरंतर मला फलंदाज बनायचे होते. विद्यालयीन दिवसांत रमाकांत आचरेकर सर आमच्या दोघांचेही प्रशिक्षक होते. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिनचे मोठे नाव होते. सुरुवातीला मी चांगल्या धावा करायचो, तेव्हा लोकांना वाटत होते की पुढचा सचिन मी बनू शकतो.” तो म्हणाला.

अजित आगरकर यांच्या १०९ धावांची हायलाइट्स येथे पहा!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

Web Title : Ajit Agarkar has set a record that Sachin has not achieved in his entire career

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)