अजिंक्य रहाणेने जिंकले हृदय; ‘कांगारू केक’ कापण्यास दिला नकार

अजिंक्य रहाणेचे एक चित्र व्हायरल होत आहे, त्यामध्ये ते ‘कांगारू केक’ घेऊन उभे आहे. ट्विटरवर लोक त्याची प्रशंसा करत आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये भारताने कसोटी मालिका २-१ ने जिंकल्यानंतर अजिंक्य रहाणेचे सर्व बाजूंनी कौतुक होत आहे. मुंबई येथे पोहचल्यावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारतात परतल्यानंतर त्याने हे सिद्ध केले की, तो केवळ एक चांगला कर्णधारच नाही तर एक महान व्यक्तीदेखील आहे.


‘कांगारू केक’ नाही कापला

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून अजिंक्य रहाणे त्याच्या घरी परतला तेव्हा त्याच्या शेजार्‍यांनी खास केक मागविला. या केकवर तिरंगा पकडून कांगारूच्या आकाराची आकृती होती. रहाणेने विनम्रपणे केक कापण्यास नकार दिला.


ऑस्ट्रेलियामध्ये कांगारूंचे महत्त्व

कांगारू केवळ ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी नाही तर या देशाचे राष्ट्रीय चिन्ह ‘कोट ऑफ आर्म्स’मध्येदेखील या प्राण्याचे चित्र आहे. इथल्या काही करेंसीतही कांगारूचे चित्र आहे. यामुळेच रहाणेला या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करणे योग्य वाटले नाही.


रहाणेचे चित्र व्हायरल झाले

अजिंक्य रहाणे आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत कांगारू केकसमोर दिसला आहे. त्याचे हे चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते या भारतीय क्रिकेटपटूचे जोरदार कौतुक करीत आहेत. काही ट्विट पाहू.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER