अजय देवगणच्या ‘मैदान’मध्ये आंततराष्ट्रीय फुटबॉल खेळाडूही दिसणार

Maharashtra Today

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये खेळांवर किंवा खेळाडूंवर आधारित सिनेमे तयार करण्याची लाट आली आहे. विविध खेळ आणि खेळाडूंवर जसे सिनेमे तयार करण्यात आले तसेच अगदी आजही तयार होत आहेत. या यादीत बोनी कपूर (Boney Kapoor) निर्मित, अमित शर्मा (Amit Sharma) दिग्दर्शित अजय देवगण (Ajay Devgan) अभिनीत ‘मैदान’ सिनेमाचाही समावेश आहे. भारतातील प्रख्यात फुटबॉल कोचच्या जीवनावर आधारित हा सिनेमा गेल्या वर्षी येणार होता, पण कोरोनामुळे याचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नव्हते. अनलॉकनंतर सिनेमाचे शूटिंग सुरु झाले असले तरी याचे शेवटचे शेड्यूल कोरोनामुळेच पुढे ढकलावे लागले आहे. या सिनेमात अनेक आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू दिसणार असून लवकरच त्यांच्यासोबत शूटिंग सुरु केले जाणार आहे. सिनेमाचे एक महिन्याचे शूटिंग बाकी असल्याचे सांगितले जात आहे.

मैदान सिनेमात भारतीय फुटबॉल टीमच्या सुवर्ण युगाची गाथा दाखवली जाणार असून अजय देवगण प्रख्यात फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारीत आहे. सय्यद अब्दुल रहीम हे भारतातील सगळ्यात मोेठे आणि उत्कृष्ट फुटबॉल कोच म्हणून ओळखले जातात. १९५२ ते १९६२ पर्यंत त्यांचेच राज्य होते. या सिनेमाचे काही दिवसांपूर्वी शूटिंग सुरु असतानाच दिग्दर्शक अमित शर्माला कोरोना झाल्याने तो होम क्वारंटाईन झाल्याने सिनेमाचे शूटिंग थांबवावे लागले होते. मात्र आता तो कोरोना निगेटिव्ह झाला असून सिनेमाचे शूटिंग सुरु करण्यात आले आहे. फुटबॉलवर आधारित हा सिनेमा असल्याने आणि भारतीय फुटबॉल टीमने काही आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅचेस खेळलेल्या असल्याने त्या त्या देशातील खेळाडूंना शूटिंगसाठी आमंत्रित केले जाणार आहे. थायलँडमधून फुटबॉलपटू भारतात आले असून लवकरच त्यांच्यासोबत शूटिंग केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या देशातील खेळाडूंना बोलावण्यात येणार असून काही दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा शूटिंग सुरु करणार असल्याची माहिती दिग्दर्शक अमित शर्माने दिली.

अजय देवगणने या भूमिकेसाठी स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले असल्याचे सांगून अमित शर्मा म्हणाला, अजयने स्वतःला केवळ एक फुटबॉलर म्हणून घडवले नाही तर या प्रोजेक्टसोबतही तो जोडला गेलेला आहे. अजय देवगणची मेहनत प्रेक्षकांना सिनेमा पाहाताना जाणवेलच. अजय देवगणशिवाय हा सिनेमा तयार झालाच नसता. हा सिनेमा अजयला अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक नक्कीच मिळवून देईल असेही अमित शर्माने सांगितले.

निर्माता बोनी कपूरने सांगितले, जवळ जवळ एक महिन्याचे शूटिंग बाकी आहे. पण विविध देशातील खेळाडू भारतात येणार असल्याने त्यांना वेळ देण्यात येणार आहे. त्यामुळे सिनेमाचे शूटिंग मे एंडपर्यत चालेल. सिनेमा ज्या प्रकारे तयार होत आहे त्याने मी प्रचंड आनंदी आहे. हा एका अशा खऱ्या घटनेवर आधारित सिनेमा आहे जी अनेकांना ठाऊक नाही. अमित शर्माने खूप चांगले काम केले आहे. बॉलिवूडच्या काही उत्कृष्ट सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणून या सिनेमाचा गौरव होईल याची मला खात्री आहे.”

सिनेमा १५ ऑक्टोबर २०२१ ला संपूर्ण देशभरात हिंदी, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेतही रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button