वाढदिवसानिमित्त ‘आरआरआर’मधील अजय देवगणचा फर्स्ट लुक रिलीज

Maharashtra Today

‘बाहुबली’ सिनेमामुळे लोकप्रियता आणि यश मिळवलेला दिग्दर्शक राजामौली (SS Rajamouli) सध्या आरआरआर (RRR) या त्याच्या बहुचर्चित, मल्टीस्टारर सिनेमाच्या निर्मितीत व्यस्त आहे. या सिनेमात साऊथचे दोन सुपरस्टार रामचरण (Ram charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) मुख्य भूमिका साकारीत असून आलिया भट्ट (Alia Bhatt) नायिकेची तर अजय देवगण (Ajay Devgan) एका स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारीत आहे. राजामौलीने सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लुक त्यांच्या त्यांच्या वाढदिवशी रिलीज करण्यास सुरुवात केली होती. सर्वप्रथम गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ज्युनियर एनटीआर, नंतर गेल्या महिन्यात २७ मार्च रोजी रामचरण आणि त्यापूर्वी १५ मार्च रोजी आरआरआर सिनेमातील आलियाचा फर्स्ट लुक तिच्या वाढदिवशी रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्त सिनेमातील त्याचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला. अजयचा हा लुक प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून त्याची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली जाऊ लागली आहे.

दिग्दर्शक राजामौलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर आरआरआर सिनेमाचे एक मोशन पोस्टर रिलीज केले. या मोशन पोस्टरमध्ये अंगाभोवती मोठा कपडा गुंडाळलेला अजय देवगण वाळवंटातच उभा असल्याचे दिसत असून अनेक जण त्याच्यावर बंदुका ताणून उभे असल्याचे दिसत आहे. ते हळू हळू अजयकडे सरकताना दिसत असतानाच अजय देवगणचा ‘LOAD… AIM… SHOOT…’ बोलताना दिसत आहे. सगळे जवळ येत असतानाच अजय त्याच्या अंगावरील कपडा फेकून देतो आणि दोन्ही हात बाजूला करतो. त्याची ही पोज अत्यंत जबरदस्त असून यावेळी देण्यात आलेले संगीतही जबरदस्त आहे. अजयचा हा लुक खूपच आकर्षक आहे.

‘आरआरआर’ सिनेमाचे पूर्ण नाव रौद्रम रणम रुधिरम (Roudram Ranam Rudhiram) असे असून हा सिनेमा मूळ तामिळ भाषेत तयार केला जात असून नंतर १० भारतीय भाषांमध्ये १३ ऑक्टोबर २०२१ ला रिलीज केला जाणार आहे. या सिनेमाची प्रचंड हवा झाली असून याचे विविध रिलीज अधिकार घेण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागली होती. आतापर्यंत विविध विभागाचे रिलीज राईट्स विकण्यात आले असून यापोटी निर्मात्यांना घरबसल्या ६०० कोटी रुपये मिळाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button