अजय देवगणचा 16 वर्षांपूर्वीचा डब्यातील चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार

Naam - Ajay Devgan

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या तयार न झालेल्या चित्रपटाचा फोटो टाकून त्याची आठवण ताजी केली. यासोबतच आता अजय देवगनच्याही (Ajay Devgan) एका चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. बॉलिवुडमधील (Bollywood) अनेक मोठ्या कलाकारांचे चित्रपट तयार होऊनही डब्यात बंद आहेत. हे असे रखडलेले चित्रपट आहेत जे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित कोणीच करणार नाही. अशा चित्रपटांना ओटीटीने चांगला हात दिला आहे. ओटीटी हा राक्षस असल्याने त्याला सतत कटेंटची आवश्यकता असते. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवाले कंटेटच्या शोधात असतात. त्यामुळेच अजय देवगणचा 16 वर्षांपूर्वीचा डब्यात गेलेला चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रख्यात दिग्दर्शक अनीस बाजमीचा दहा वर्षांपासून तयार असलेला हरमन बावेजा आणि जेनेलिया डिसूझा अभिनीत ‘इट्स माय लाइफ’ ओटीटीवर आला होता. याच अनीस बाजमीचा अजय देवगन अभिनीत चित्रपट ओटीटीवर येणार असून याचे नाव आहे ‘नाम’.

16 वर्षांपूर्वी म्हणजे 2004 मध्ये अनीस बाजमीने अजय देवगण, समीरा रेड्डी आणि भूमिका चावलाला घेऊन बेनाम नावाने चित्रपट सुरु केला होता. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगनला लाँच करणाऱ्या ‘फूल और कांटे’चा निर्माता असलेल्या दिनेश विजनने केली होती. बेनाम एक सस्पेंस थ्रिलर होता आणि अजय देवगन त्यात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार होता. चित्रपट पूर्ण झाला खरा पण काही कारणामुळे प्रदर्शित होऊ शकला नव्हता. त्यानंतर 2008 आणि 2013 मध्ये पुन्हा एकदा याच्या प्रदर्शनाची तयारी करण्यात आली. ट्रेलरही रिलीज करण्यात आला. पण पुन्हा एकदा कुठे तरी माशी शिंकली आणि चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता मात्र चित्रपटाच्या नावातील ‘बे’ शब्द काढून फक्त ‘नाम’ असे नाव ठेवण्यात आले असून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER