अजय देवगणने सुरु केले अमिताभ बच्चनसोबतच्या चित्रपटाचे काम

Ajay Devgan-Amithabh Bachchan

काही दिवसांपूर्वी अजय देवगणने (Ajay Devgn)अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दिग्दर्शित करणार असल्याचे सांगत ‘मे डे या सिनेमाची घोषणा केली होती. अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शित करण्याचे अजय देवगणचे स्वप्न होते आणि ते पूर्ण होणार असल्याने तो प्रचंड खुश झाला होता. अजयने मे डे सिनेमाचे कालपासून म्हणजेच शुक्रवारपासून हैदराबादमध्ये शूटिंग सुरु केले आहे.

अजयने जेव्हा या सिनेमाची घोषणा केली तेव्हा तो त्याच्या ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. कोरोनामुळे या सिनेमाचे शूटिंग थांबले होते. लॉकडाऊन उठल्यानंतर अजयने लगेचच या सिनेमाचे उरलेले शूटिंग पूर्ण केले. आणि आता शुक्रवारपासून हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये अजय देवगणने त्याच्या संपूर्ण टीमसह ‘मे डे’चे शूटिंग सुरु केले आहे. अजय जेव्हा हैदराबादमध्ये भुजचे शूटिंग करीत होता तेव्हाच त्याने ‘मे डे’ चित्रपटाची योजना तयार केली होती.

भुजचे शूटिंग पूर्ण होताच ‘मे डे’च्या शूटिंगची योजना त्याने आखली आणि लगेचच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात नायकाची भूमिका साकारण्याबरोबरच अजय देवगण याची निर्मिती आणि दिग्दर्शनही करीत आहे. अजय देवगणसोबत या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही मुख्य भूमिका आहे. विशेष म्हणजे अजयने सिनेमाची घोषणा करतानाच त्याच्या प्रदर्शनाचीही तारीख 29 एप्रिल 2022 अशी जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER