अमेझॉनबरोबर अजय देवगणने केला पाच चित्रपटांचा करार

Ajay Devgan

अजय देवगण (Ajay Devgan) सध्या यशाच्या शिखरावर आहे. कोरोनाचे (Corona) संकट सुरु होण्यापूर्वीच या वर्षीच्या सुरुवातीला त्याचा तान्हाजी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 350 कोटी रुपयांच्या आसपास व्यवसाय केला. त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने चित्रपटगृहे बंद झाली. त्यामुळे नवीन चित्रपट प्रदर्शितच होऊ शकले नाही. आता डिसेंबरपर्यंत मोठा नवा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता नसल्याने अजयचा ‘तान्हाजी’ यावर्षीचा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

त्यासोबतच अजयने कोरोना काळात अनेक नवीन चित्रपट एकीकडे साईन केले असतानाच त्याने अमिताभ बच्चनसोबतही (Amitabh Bachchan) एका चित्रपटाची योजना आखली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय स्वतः करणार असून प्रथमच तो अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शितही करणार आहे. विशेष म्हणजे पुढील महिन्यापासूनच हैदराबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले जाणार आहे.

आता अजय देवगणची आणखी एक मोठी बातमी आली असून त्याने अमेझॉन प्राइमसोबत (Amazon Prime) एक मोठे डील केले आहे. अजयच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार अजयने अमेझॉनसोबत पाच चित्रपटांचा करार केला आहे. विशेष म्हणजे अमेझॉनने यापूर्वी सलमान खानसोबतही करार केला आहे परंतु अजयच्या चित्रपटांची संख्या सलमानच्या चित्रपटांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

अजय सध्या स्टार नेटवर्कच्या ‘मैदान’ चित्रपटात काम करीत आहे. तसेच हॉटस्टारच्या वेबसीरीज ‘लूथर’मध्येही अजय देवगण काम करणार आहे. अमेझॉननला अजयच्या डिज्नी हॉटस्टारवर केल्या जाणाऱ्या डिजिटल प्रवेशाबाबत कोणताही आक्षेप नाही. अमेझॉन अजय देवगणला पाच चित्रपटांसाठी कोट्यावधींची रक्कम देणार आहे. मात्र त्याचा आकडा सांगण्यात आला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER