अजय देवगणची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही

Ajay Devgan

बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्या अनेक इच्छा असतात. एखाद्या कलाकाराला एखाद्या विशिष्ट दिग्दर्शक किंवा कलाकाराबरोबर काम करायचे असते तर एखाद्या निर्मात्याला एखाद्या विशिष्ट कलाकारांना घेऊन चित्रपट तयार करण्याची इच्छा असते. तर काही कलाकारांना एखादी विशिष्ट भूमिका साकारण्याची इच्छा असते. मात्र काही जणांच्याच अशा इच्छा पूर्ण होतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. अजय देवगण (Ajay Devgan) मात्र अशा एका आनंदापासून मुकला आहे. त्याची एक इच्छा कधीही पूर्ण होण्याची शक्यता आता दिसत नाही.

अजय देवगणने फूल और कांटेमधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्याने नायक म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि तो यशस्वीही झाला. बॉलिवूडमधील बहुतेक कलाकारांबरोबर त्याने काम केले आहे. तो निर्माताही झाला, दिग्दर्शकही झाला. पण त्याची एक इच्छा अपुरीच राहिली. आणि ही इच्छा होती प्रख्यात अभिनयसम्राट दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची. खरे तर बॉलिवूडमध्ये एकटा अजय देवगणच नव्हे तर असे अनेक कलाकार आहेत ज्यांना दिलीपकुमारसोबत काम करण्याची इच्छा होती. त्यापैकी काही जणांची ती इच्छा पूर्ण झाली. पूर्ण चित्रपट नाही पण एखाद्या दृश्यात तरी दिलीप कुमार सोबत काम करण्याची संधी मिळावी अशी अजय देवगणची खूप वर्षांपासूनची इच्छा होती.

या इच्छेमुळेच अजय देवगणने दिलीप कुमार यांना घेऊन एका चित्रपटाची योजना आखली होती. चित्रपटाचे नाव ‘असर- द इम्पॅक्ट’ ठेवण्यात आले होते. कागदावर याची सर्व योजना तयार झाली परंतु काही कारणाने हा चित्रपट सुरु होऊ शकला नाही. त्यानंतर मात्र अशी योजना तयार झाली नाही आणि आता तर दिलीप कुमार अत्यंत वृद्ध झाले असून ते काम करूच शकणार नाहीत. त्यामुळे अजयची ही इच्छा अपूर्णच राहाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER