अजय देवगनही आता वेब सीरीजच्या जाळ्यात

Ajay Devgan

सिंघम चित्रपटामुळे एका धाडसी इन्स्पेक्टरच्या रुपात अजय देवगनने (Ajay Devgn) प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यानंतर यावर्षी आलेल्या तान्हाजी चित्रपटामुळे अजयच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. चित्रपटात व्यस्त असल्याने अजय देवगन इतक्या लवकर वेबसीरीज मध्ये येईल असे वाटले नव्हते. अजयचा भुज द प्राईड चित्रपट याच महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

अजयच्या अत्यंत जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजयने एका वेब सीरीजला होकार दिला असून या वेब सीरीजचे शूटिंग पुढील वर्षी सुरु होणार आहे. या वेबसीरीजमध्ये अजयच्या नायिकेची भूमिका इलियाना डिक्रूज साकारणार आहे. या दोघांनी यापूर्वी रेड आणि बादशाहो चित्रपटात एकत्र काम केलेले आहे. लूथर नावाजी एक ब्रिटिश टीव्हीवरील लोकप्रिय वेब सीरीज आहे. या वेबसीरीजची हिंदी रिमेक तयार करण्यात येणार असून यात अजय मुख्य भूमिका साकारणार आहे. अजयला जेव्हा निर्मात्यांनी या प्रोजेक्टबद्दल विचारले तेव्हा तो लगेचच तयार झाला आणि पुढील वर्षीच्या डेट्स देण्याचेही मान्य केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वेब सीरीजसाठी अजयला तगडी रक्कम देण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER