अजाक्षीर – दुर्लक्षित पण उपयोगी !

Aja Ksheera

आयुर्वेदात गाय म्हैस बकरी मेंढी अशा विविध प्राण्याचे दूध गुणवर्णन आढळते. शहरातून सहसा गाय वा म्हशीचे दूध सेवन केल्या जाते. बकरीच्या दूधाविषयी माहिती नसते. पण बकरीचे दूध अनेक ठिकाणी उपलब्ध होते. मातेचे दूध बाळाला काही कारणास्तव उपलब्ध नसेल तर अजाक्षीर बाळाला देण्यास सांगितले आहे. का सांगितले असावे बरे? बघूया बकरीच्या दुधाचे गुण-

अल्पाम्बुपानव्यायाम कटुतिक्ताशनै: लघुः ।
आजं शोष ज्वरश्वास रक्तपित्तातिसारजित् ॥

बकरी स्वभावतःच पाणी कमी पिते व रानोमाळ भटकते त्यामुळे व्यायाम पुष्कळ होतो. तसेच ती तिखट कडू वनस्पती पाने खात असते. म्हणून बकरीचे दूध हलके असते.

बकरीचे जाठराग्निवर्धन करणारे असते. बकरीचे दूध विशेष रुपाने क्षयरोगनाशक आहे. आयुर्वेद संहितामधे क्षयरोग्याला अजाक्षीर ( बकरीचे दूध) पिण्यास सांगितले आहे तसेच रुग्णाला बकऱ्या राहतात त्या कोंडवाड्यात ठेवतात. “अजधेनुभिः सह समावसेत् क्षयी” अर्थात क्षय असलेल्या रुग्णास दूध देणाऱ्या बकऱ्यांसोबत राहावे असे म्हटले आहे.

बकरीचे दूध श्वास ( दमा ) कासनाशक, परम वातनाशक आहे. अतिसार शीघ्र कमी करणारे आहे. दुर्बल व्यक्तीचे शरीर पुष्ट करणारे आहे.

बकरीचे दूध सर्वरोगहर, पचण्यास हलके असते. त्यामुळेच लहान बाळ, दुर्बल सर्वांनांच लवकर पचते. गाय व म्हशींच्या दूधातील वसाकण पचायला जड असतात. जे बाळ वा अशक्त व्यक्तींची भूक मंद करते. परंतु बकरीचे दूध अग्निवर्धक, पाचक, बल देणारे हे त्या अवस्थेकरता अतिशय समर्पक कार्य करणारे आहे.

कोविड रुग्णां मधेदेखील हिच लक्षणं सापडतात. श्वास कास अशक्तपणा अग्निमांद्य ही लक्षण आढळून येतात. अशावेळी बकरीचे दूध अतिशय उपयुक्त ठरु शकेल. पौष्टीक, हलके, श्वासकासहर, जाठराग्नीवर्धक आणि मुख्य म्हणजे आहारद्रव्य !

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button