कोरोनामुळे ऐश्वर्याच्या नव्या सिनेमाचे शूटिंग झाले रद्द

Aishwarya Rai - Mani Ratnam

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये गेल्या एक-दीड महिन्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोना (Corona) होऊ नये म्हणून सगळी काळजी घेणाऱ्या बॉलिवूडच्या काही मोठ्या कलाकारांना कोरोना झाल्याचे मागील काही दिवसात समोर आले आहे. ज्या कलाकारांना कोरोनाची लागण झाली त्यांची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी दिलीच आहे. कोरोनामुळे अनेक सिनेमांचे रिलीजही कसे पुढे ढकलण्यात आले त्याची माहितीही आम्ही तुम्हाला दिली होती. आता कोरोनामुळे काही सिनेमांचे शूटिंग रद्द करण्याची वेळही काही निर्मात्यांवर आली आहे. कोरोनामुळेच ऐश्वर्या रायचा (Aishwarya Rai) मणिरत्नम (Maniratnam) दिग्दर्शित नव्या सिनेमाचे शूटिंग रद्द करावे लागले आहे. कोरोनाची प्रकोप कमी झाल्यावर आता या सिनेमाचे शूटिंग सुरु करण्यात येणार आहे.

ऐश्वर्या रायने २०१८ मध्ये आलेल्या ‘फन्ने खां’ सिनेमात काम केले होते. या सिनेमात तिच्यासोबत अनिल कपूर (Anil Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांच्या भूमिका होत्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. ऐश्वर्याचे वय झाल्याने आणि तिची बॉक्स ऑफिसवरील जादू ओसरल्याने निर्माते तिला सिनेमात घेण्यास कचरू लागले आहेत. पण मणिरत्नमने त्याच्या नव्या ‘पोन्नियिन सेल्‍वन’ या तामिळ सिनेमात मुख्य भूमिका साकारण्यासाठी ऐश्वर्याची निवड केली. या सिनेमाचे गेल्या महिन्यापासून भोपाळ येथे शूटिंगही सुरु झाले होते.

मध्य प्रदेश सरकारने भोपाळमध्ये सिनेमाच्या शूटिंगसाठी भरपूर सबसिडी देण्याचे मान्य केल्याने आणि तेथे चांगले लोकेशन असल्याने अनेक निर्मात्यांनी भोपाळकडे धाव घेतली होती. गेल्या तीन-चार महिन्यात मध्य प्रदेशमध्ये अनेक मोठे सिनेमे, वेबसीरीजचे शूटिंग करण्यात आले. आणि अजूनही काही निर्माते मध्य प्रदेशमध्ये आहेत. मात्र १०-१५ दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने निर्मात्यांनी भोपाळमधील शूटिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. अगोदर आर माधवनने त्याच्या सिनेमाचे शूटिंग रद्द केले आणि आता मणि‍रत्‍नमने त्याच्या ‘पोन्नियिन सेल्‍वन’चे पुढील महिन्यात आयोजित केलेले शूटिंग शेड्यूल रद्द केले आहे. गेल्या महिन्यातच ऐश्वर्या आणि मणिरत्नमने प्रथम थायलँड आणि नंतर हैदराबाद आणि पुद्दुचेरीत सिनेमाचे शूटिंग केले होते. ९ एप्रिलपासून या सिनमाचे भोपाळमध्ये शूटिंग सुरु केले जाणार होते. परंतु आता ते रद्द करण्यात आले आहे. ‘पोन्नियिन सेल्‍वन’ हा मणिरत्‍नमचा सगळ्यात महत्वाकांक्षी सिनेमा असून या सिनेमानंतर तो रिटायरमेंट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मणिरत्‍नमला भोपाळमध्ये ८०० ज्यूनियर आर्टिस्टसोबत शूटिंग करायचे होते. यामुळे कोरोना आणखी वाढेल असे सरकारला वाटत आहे. त्यामुळे सरकारने इतक्या मोठ्या संख्येने कलाकार घेऊन शूटिंग करण्यास नकार दिला. तेव्हा मणिरत्नमने ८०० ऐवजी २०० कलाकारांचा वापर करतो असे सांगितले पण त्यालाही सरकारने नकार दिल्याने अखेर शूटिंग रद्द करावे लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button