बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाच्या वाढदिवसाला अभिनेत्रीची हजेरी ; चर्चेला उधाण

alaya-f-joins Aishwarya Thackeray birthday-celebrations

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नातू ऐश्वर्य ठाकरेनं (Aishwarya Thackeray) नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. दुबईमध्ये पार पडलेल्या या बर्थ-डे सेलिब्रेशनला अभिनेत्री पूजा बेदी मुलगी अलाया फर्नीचरवालाने हजेरी लावली होती. यावरून उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत .

या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ ऐश्वर्य ठाकरेची आई व निर्मात्या स्मिता ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी अलायाचा उल्लेख केला आहे.

दरम्यान ऐश्वर्यने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये आई स्मिता ठाकरे आणि अलाया या दोघींना टॅग केले आहे. अलायाने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.या चित्रपटाच्या प्रिमिअरला देखील ऐश्वर्यने हजेरी लावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER