दुहेरी भूमिका साकारत मणिरत्नमच्या सिनेमातून ऐश्वर्या राय करणार पुनरागमन

Mani Ratnam-Aishwairya Rai

बॉलिवुडमधील (Bollywood) सगळ्यात सुंदर अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आगमन करण्यास सज्ज झाली आहे. साऊथ सिनेसृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक मणिरत्नमच्या ( Mani Ratnam) सिनेमात ऐश्वर्या राय काम करणार असून या सिनेमात तिच्यासोबत साऊथचा सुपरस्टार चियान विक्रमह दिसणार आहे. दोन भागात तयार होणाऱ्या या सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरु केले जाणार आहे. खरे तर या सिनेमाची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात येणार होती पण ऐश्वर्या रायने 2007 मधील गुरु सिनेमाच्या सेटवरील एक फोटो शेअर केल्याने ही बातमी उजेडात आली आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय अभिनीत ‘गुरु’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता. रिलायंसचे सर्वेसर्वा धीरुभाई अंबानी यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांसह समीक्षकांचीही पसंती लाभली होती. या सिनेमाच्या प्रीमियरच्या दरम्यानचे काही फोटो ऐश्वर्या रायने शेअर केले आहेत. हे फोटो म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लव स्टोरीचा पुढचा भाग आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्याने निळी साडी नेसलेली दिसत असून अभिषेक बच्चन माध्यमांना मुलाखत देत आहे. लांबवर मणिरत्नमही दिसत आहे.

या फोटोंसोबत ऐश्वर्या रायने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘याच दिवशी, 14 वर्षे गुरु कायमसाठी.’ ऐश्वर्या रायने शेअर केलेल्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. ऐश्वर्याने ही पोस्ट टाकण्याचे कारण म्हणजे या प्रीमियरनंतरच अभिषेकने ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली होती. एकाने म्हटले आहे, आम्ही तुम्हाला लवकरात लवकर पुन्हा पडद्यावर पाहू इच्छितो. ऐश्वर्याला पुन्हा एकदा मणिरत्नमच्या सिनेमातून पडद्यावर आले पाहिजे असेही या फॅनने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे, ‘जगातील सगळ्यात सुंदर महिला.’

या पोस्टनंतर लगेचच ऐश्वर्या राय पुन्हा सिनेमात दिसणार असल्याची माहिती मिळाली. ऐश्वर्याने मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ सिनेमात काम करण्यास होकार दिला असून हा सिनेमा कल्की कृष्णमूर्तिच्या फिक्शन नॉव्हेलवर आधारित असून हा दोन भागांमध्ये निर्माण केला जाणार आहे. या सिनेमात ऐश्वर्या राय डबल रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत साऊथचा सुपरस्टार चियान विक्रम, त्रिशा, जयम रवि इत्यादी कलाकार दिसणार आहेत. या सिनेमाचे यावर्षीच शूटिंग सुरु केले जाणार असून यावर्षी किंवा पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान सिनेमा रिलीज करण्याचा मणिरत्नमचा विचार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER