ऐश्वर्या राय बच्चनचे मॉडेलिंगच्या दिवसांचे फोटोज

Aishwarya Rai Bacchan

ऐश्वर्या राय बच्चनचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला होता. ऐश्वर्याने अगदी लहानपणापासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली. १९९४ मध्ये विश्व सुंदरीच्या उपाधीने तिच्यासाठी चित्रपटांची दारे उघडली. लुकबद्दल बोलतांना, तिच्या मॉडेलिंगच्या दिवसापासून आतापर्यंत तिचे लुक बरेच बदलले आहेत. तर मग आपण तिच्या काही जुने फोटोज बघूया.

ऐश्वर्या रायला प्रथम आर्किटेक्ट व्हायचे होते. यासाठी तिने प्रवेशही घेतला होता पण मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी तिने आपला अभ्यास मध्यभागी सोडला. ऐश्वर्याने पाच वर्ष शास्त्रीय नृत्य प्रशिक्षणही (Classical Dance Training) घेतले आहे.

शालेय काळापासूनच ऐश्वर्याला मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. नववीत शिकत असताना तिने पहिला जाहिरात चित्रपट (Ad Film) केला. ती पेन्सिलची जाहिरात होती. १९९३ मध्ये ऐश्वर्याने आमिर खान आणि महिमा चौधरी यांच्यासोबत पेप्सीसाठी जाहिरात केली होती. या जाहिरात चित्रपटाने तिला बरीच प्रसिद्धी मिळाली.

ऐश्वर्या रायने १९९४ मध्ये मिस वर्ल्ड टायटल जिंकले होते. यानंतर, तिने आपली कारकीर्द मॉडेलिंगकडे वळविली आणि नंतर चित्रपटांकडे वळली. १९९७ मध्ये ‘इरुवर’ या तामिळ चित्रपटातून तिने पदार्पण केले. त्याचवर्षी हिंदीमध्ये ऐश्वर्याचा पहिला चित्रपट ‘और प्यार हो गया’ रिलीज झाला.

ऐश्वर्याने तिच्या करिअरमध्ये भरपूर हिट चित्रपट दिली. हम दिल दे चुके सनम, ताल, मोहब्बतें, देवदास, उमराव जान, धूम २, गुरू, जोधा अकबर, ज्जबा आणि ऐ दिल है मुश्किल या सारख्या अनेक चित्रपट तिने केले. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी गाठ बांधली होती. या दोघांनाही आराध्या बच्चन ही मुलगी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER