ऐश्वर्या पिस्सेने उंचावला मोटारस्पोर्टस्मध्ये भारताचा झेंडा

एफआयएम वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू

Capture

बंगळुरू : मोटारस्पोर्टसमधील जागतिक विजेतेपद पटकावणारी ऐश्वर्या पिस्से ही पहिली भारतीय ठरली आहे. बंगळुरूच्या या २३ वर्षीय साहसी खेळाडूने हंगेरीत पार पडलेली महिलांची एफआयएम (फेडरेशन इंटरनॅशनल डी मोटारसायक्लीज्म) वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून हा मान मिळवला आहे.

ऐश्वर्याने दुबई येथे पहिली फेरी जिंकली होती. पोर्तुगालमधील फेरीत ती तिसरी, स्पेनमध्ये पाचवी आणि हंगेरीत चौथी आली होती. यामुळे तिच्या खात्यावर सर्वाधिक ६५ गूण होते. पोर्तुगालची रिता व्हिएरा ६१ गुणांसह दुसºया स्थानी राहिली.

ज्युनियर गटात ऐश्वर्या ४६ गुणांसह दुसºया स्थानी राहिली. या गटात चिलीच्या थॉमस डी गाव्हार्दो हिने ६० गुणांसह विजेतेपद पटकावले.

हंगेरियन स्पर्धेआधी ऐश्वर्या व रिता या दोन्हीच विजेतेपदाच्या दावेदार होत्या. त्यात चौथ्या स्थानामुळे ऐश्वर्याला १३ गूण तर रिताला तिसºया स्थानासह १६ गूण मिळाले.

ही बातमी पण वाचा : अबब! 140 किलो वजनाचा क्रिकेटपटू

या यशाबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाला की माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्द नाहीत. गेल्या वर्षी पहिल्यांदाच आंतरराष्टÑीय पातळीवर खेळताना माझा स्पेनच्या सर्किटमध्ये अपघात झाला होता आणि दुखापतींमुळे माझी कारकिर्दच धोक्यात येते की काय, अशी स्थिती झाली होयी त्यातून सावरत विजेतेपद मिळवणे याचा आनंद वेगळाच आहे.

गेल्या वर्षभराचा अपघातानंतरचा काळ आपल्यासाठी खडतर होता परंतु मी स्वत:वर विश्वास कायम ठेवला आणि मोटारसायकलवर पुन्हा स्वार होण्याचा निर्धार केला. त्यासाठी सहा महिने लागले आणि म्हणूनच विश्वचषक जिंकणे हे फार मोठे यश आहे आणि या अनुभवाने भविष्यात आपण अधिक चांगली कामगिरी करू, असे ऐश्वर्याने म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : वीरपुत्र अभिनंदन वर्धमान वीरचक्राने सन्मानित होणार