एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला! ४५ लाख प्रवाशांची माहिती ‘लीक’

Maharashtra Today

दिल्ली :- हवाई वाहतूक क्षेत्रातील सार्वजनिक विमानसेवा कंपनी एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर (AirIndia reports Cyber Attack) हल्ला झाला आहे. फेब्रुवारी २०२१च्या शेवटच्या आठवड्यात हा हल्ला झाला असून, २६ ऑगस्ट २०११ ते ३ फेब्रवारी २०२१ या कालावधीतील ४५ लाख प्रवाशांची माहिती लीक (45 lakh passenger information ‘leaked’) झाली, अशी माहिती एअर इंडियाने दिली. या माहितीत प्रवाशांच्या नावासह जन्म तारीख, संपर्क क्रमांक, पासपोर्टवरील माहिती, क्रेडिट कार्डची माहिती यासह इतर माहिती चोरली गेली आहे.

एअर इंडियाने निवदेन प्रसिद्ध करून माहिती दिली आहे की, फेब्रुवारी २०२१च्या शेवटच्या आठवड्यात ‘सीता’ या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला. यातून प्रवाशांची महत्त्वाची माहिती चोरीला गेली आहे. यात प्रवाशाच्या नाव, जन्म तारीख, पासपोर्टबद्दलची माहिती, क्रेडिट कार्ड, तिकीटाबद्दलची माहिती आहे.

आमच्या प्रवाशांना आम्ही सूचित करू इच्छितो की, डेटा सर्व्हवर सायबर हल्ला झाल्याची माहिती प्रवासी सेवा पुरवठा प्रणालीकडून मिळाली आहे. सध्या कंपनी डेटा प्रोसेसर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. या प्रवाशांनी त्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड बदलावा, असे एअर इंडियाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button