कोल्हापूर – सांगलीची हवेची गुणवत्ता ढासळली

Air Pollution

कोल्हापूर : सांगली (Sangli) आणि कोल्हापूर (Kolhapur) शहराची हवा दिवसेंदिवस ढासळत आहे. येथील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. त्यामुळे या शहरांचा समावेश सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत झाला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने देशभरातील 122 प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली. त्यात सांगलीसह कोल्हापूर शहराचाही समावेश आहे.

एकेकाळी सांगली आणि कोल्हापूरची हवा
अत्यंत चांगली समजली जात होती. मात्र, वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यात यंत्रणा अपयशी ठरल्यामुळे शहर अतिप्रदूषित शहरांच्या यादीत गेले आहे. म्हणूनच भविष्यात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोना महामारी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तर दक्ष राहून उपाययोजना कराव्या लागणार आहेत; अन्यथा कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे फटाके फोडण्यास स्वयंस्फूर्त बंदीसह राष्ट्रीय हरित लवादाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची कडक अंमलबजावणी करावी लागणार आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने शहराच्या हवेची गुणवत्ता आठवड्यातून दोनदा मोजली जाते. शिवाजी विद्यापीठ, दाभोळकर कॉर्नर, महाद्वार रोड परिसरातून ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष धोकादायकच आहेत. शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये सूक्ष्म धूलिकण (सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर) सर्वाधिक 83 मायक्रो ग्रॅम क्युबिक मीटर, महाद्वार रोड परिसरामध्ये हे प्रमाण 160, तर दाभोळकर कॉर्नर परिसरात सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण सर्वाधिक 226 मायक्रो ग्रॅम क्युबिक मीटर इतके होते. ही पातळी अत्यंत धोकादायक समजली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER