
मुंबई :- एअर कार्गोच्या ड्युटी ड्राबक सेक्शनमधील अधिकारीला १० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने अटक केली आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क विभागाने तक्रारदाराचा आईसी कोड राखून ठेवला असल्याने त्यांना त्याचा माल निर्यात करण्यास अडचणी येत होत्या. त्यासाठी त्यांनी, सीमी शुल्क विभागात धाव घेतली. तेथे ते आरोपीच्या संपर्कात आले. आरोपीने त्या कामाच्या बदल्यात दहा हजार रुपयांची मागणी केली. २० आॅगस्ट रोजी ५ हजार रुपये घेत, त्यांना १५ दिवसांसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले. मात्र त्यावेळेत मालाची निर्यात करणे शक्य नव्हते. पुढे, २४ आॅगस्ट रोजी तक्रारदाराने पुन्हा कार्यालय गाठून याबाबत विचारणा केली. तेव्हा, आरोपी अधिकारीने त्याच्याकडून आणखीन २० हजार रुपयांची मागणी केली. पुढे तडजोडी अंती १० हजार रुपयांवर व्यवहार झाला.
त्यानंतर, मात्र तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार केली. त्यानुसार, सीबीआयने बुधवारी सापळा रचून १० हजार रुपयांची लाच घेताना अधिकारीला बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे एअर कार्गोतील अन्य कर्मचारी धास्तावले आहेत.
ही बातमी पण वाचा : नोटाबंदीतील २७५ कोटी कोणाचे?